Breaking News

अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवा : लोढा समिती

नवी दिल्ली, दि. 29 - न्यायमूर्ती लोढा समितीने अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीची स्थापना केली आहे. बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे सांगत लोढा समितीने बोर्डाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
लोढा समितीने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.