साबांतील भ्रष्ट डॉनच्या मुसक्या आवळणारच!
सार्वजनिक बांधकाम : सुर्यवंशीच्या चौकशासाठी शिवक्रांतीचे आज आंदोलन
औरंगाबाद, विशेष/प्रतिनिधी, दि. 01 - अधिक्षक अभियंता ए.बी. सुर्यवंशी यांच्या मनमानी विररूध्द शिवक्रांती युवा सेनेने फुंकलेले रणशिंग सार्वजनिक बांधकाम खात्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सुर्यवंशी यांचे खास हस्तक म्हणून परिचित असलेले कार्यकारी अभियंता शेंडे आणि गाडेकर यांच्यासह अहमदनगर, संगमनेर आणि पुणे या ठिकाणी कार्यरत असलेल्या सुर्यवंशी लॉबीत अबोल अस्वस्थता पसरली आहे.कानून के हाथ बहुत लंबे होते है, आणि म्हणूनच चारो मुलूखोंकी पुलीस को चकमा देनेवाले डॉन को भी कानून दबोच लेता है। हे चित्र पडद्यावर मनोरंजन म्हणून स्वीकारले गेले असले तरी जीवनाचे वास्तव यापेक्षा वेगळे नाही. औरंगाबाद साबां मंडळातही सुर्यवंशी नामक अधिक्षक अभियंता देखील याच डॉनच्या भुमिकेत सध्या वावरत असून नजिकच्या भविष्यकाळात पडद्यावरील डॉनप्रमाणेच सुर्यवंशी आणि कंपनी कायद्याच्या कचाट्यात नक्कीच येईल असा विश्वास शिवक्रांती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी व्यक्त केला आहे.
ए.बी.सुर्यवंशी आणि कंपनीच्या भ्रष्ट उद्योगाचे पितळ उघडे पाडण्याचा चंग शिवक्रांती युवा सेनेने बांधला असून त्यांनी मंजूर आणि अदा केलेल्या देयकांचे व त्या कामांची सखोल चौकशी व्हावी अशी शिवक्रांती युवा सेनेची मागणी आहे. या मागणीच्या पुर्ततेसाठी संस्थापक अध्यक्ष संजय सावंत हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह महसुल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. शिवक्रांती युवा सेनेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साबांत चर्चेला उधाण आले असून सुर्यवंशी लॉबीत अबोल अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान औरंगाबाद साबांमंडळाच्या अखत्यारितील कार्यकारी अभियंता शेंडे आणि वृषाली गाडेकर यांचे कार्यक्षेत्रातील कामाचीही चौकशी या निमित्ताने होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर अहमदनगर, संगमनेर आणि पुणे या सुर्यवंशी यांच्या पुर्व कार्यक्षेत्रातील कामेही चौकशीच्या रडारवर येणार असल्याची चर्चा होऊ लागल्याने त्यांचे पुर्व सहकारी उपअ
भियंता, शाखा अभियंता यांचेही धाबे दणाणले आहेत.
मुख्यमंत्र्यांची फसवणूक कुणी केली?
शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता अधिक्षक अभियंता अशा 150 क्षेत्रिय अभियंत्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये कागदाआड कागद घालून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धुळ फेकली गेल्याची चर्चा आहे. कुणी केली ही चलाखी, साबांचा तो उच्चपदस्थ कोण? कशी झाली मुख्यमंत्र्यांची फसवणुक?