Breaking News

भाजपचे हे सरकार तर निजामाचे बाप निघाले

औरंगाबाद, दि. 09 -  शिवसेना सत्तेत राहूनही भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून बुधवारी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमचा लढा निजामाच्या बापाशी असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपसह इतर विरोधकांवर टीका केली. जो शिवसेनेला नडला तो गाडला गेला. एक तर तो राजकारणातून संपला किंवा तुरुंगात जाऊन बसला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत म्हणाले, फक्त शिवसेनेची लाट राज्या
त आहे. विधानसभेच्या निवडणुका आजही झाल्या तर 180 जागा शिवसेनेलाच मिळतील हे सर्वच पक्षांना माहिती आहे. दबक्या आवाजात भाजपचे नेतेही आम्हाला हेच सांगत आहेत. सत्तेत राहुनही शिवसेनेसारखा दुसरा विरोधी पक्ष नाही, अशी आज आमची प्रतिमा तयार झाली आहे.
अच्छे दिन आल्याचे मोदी सरकार सांगत असले तरी महाराष्ट्राला अजून अच्छे दिन आलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत आहेत. पण मराठवाड्यातील दुष्काळ पाहण्यासाठी इथे येण्याला त्यांना वेळ नाही. त्यांनी मराठवाड्यात आले पाहिजे. चंद्रकांत खैरेंना सोबत घ्या. ते तुम्हाला मराठवाड्यातील दुष्काळ दाखवतील, असेही ते म्हणाले.