Breaking News

मारिया शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी

मॉस्को, दि. 09 - रशियाची टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोव्हा हिच्यावर डोपिंग प्रकरणात बुधवारी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने दोन वर्षांसाठी बंदी घातली असून या निर्णयाविरोधात शारापोव्हा अपील करणार असल्याचे समजते. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये शारापोव्हाची डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तिने मेल्डोनियम नावाचे औषध घेतल्याने ही डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आली होती मात्र मारियाने या औषधावर टेनिस संघटनेने बंदी घातल्याची कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण त्या संदर्भात दिले होते.
मारियाने पाच वेळा ग्रँडस्लॅम चॅपिंयनशीप जिंकलेली आहे. तिने स्वतःच लॉस एंजेलिस येथे जानेवारीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यावेळी तिने नेहमी घेत असलेले वेदना कमी होण्यासाठीचे मेल्डोनियम औषध बॅन केले गेल्याची माहिती नसल्याचे व त्यामुळे अजाणता ते घेतल्याचे मान्य केले होते. त्यावर मार्चच्या सुरवातीला इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने तिच्यावर त्याप्तुरते निलंबन लागू केले होते. यावेळी संघाने मारियाचा धोका देण्याचा उद्देश नसेलही तरीही डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह येण्यास तीच जबाबदार असल्याचे व ति
च्या हातून ही मोठीच चूक झाल्याचे सांगितले.