मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपावर पलटवार
मुंबई, दि. 11 - केंद्र व राज्यातील सत्तेतील साथीदार भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील कलगीतुरा रंगतच चालला असून भाजपाने पोस्टरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता शिवसेनेने पोस्टरमधून नरेंद्र मोदींना ’आयत्या बिळात नागोबा’ म्हणत भाजपावर पलटवार केला आहे.
शवसेनेच्या पोस्टरमध्ये नरेंद्र मोदींची ‘चुरणबाबा’ आणि ‘आयत्या बिळावरचा नागोबा’ अशा शब्दांत संभावना करण्यात आली आहे. ’ आयत्या बिळात नागोबा.. शिवसेनेच्या जोरावर आजवर पसरलात! गद्दार .. आमचे उपकार विसरलात!!’ अशा कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. तसेच ’ अच्छे दिन, बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला काही घाई नाही, तसंच विदेशात खूप झालं, जरा देशात बघा, मातोश्रीचे उपकार इतक्या लवकर विसरणारी हीच का ती नमोची भाजप? ’ असा सवाल विचारणारी पोस्टर्सही व्हायरल झाली असून त्याखाली ’शिवसेना कडकच’ असंही लिहीण्यात आलं आहे.
केंद्रात निजामाच्या बापाचं राज्य अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलेली टीका भाजपाला रुचली नाही. त्यावर ’ इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे ’ असा प्रतिटोला भाजपाने शिवसेनेला हाणला. तसेच विविध पोस्टर्सच्या माध्यमातून भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.