Breaking News

वृक्षारोपण झाले आता वृक्षसंवर्धनाची गरज

अहमदनगर, दि. 09 - पर्यावरण दिनानिमित्त अनेक संघटनांनी अनेक संस्थांनी आणि अनेक शासकीय कार्यालयात वृक्षारोपन करण्यात आले. मात्र आता लावलेले वृक्ष जगवण्याची आपलीच गरज असल्याचे समजून आता ते वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षारोपन ही चळवळ व्यापक व्हावी यासाठी विविध स्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत. यात काही प्रमाणात यशही आले आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी पत्रकार समाजात चेतना जागवित आहे.
पर्यावरण दिना निमित्त विविध स्तरातुन वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड, वृक्षाचे वाटप आदि कार्यक्रम संपन्न झाले. अनेक मान्यवरांनी या विषयावर मार्गदर्शन करुन प्रबोधन केले आहे. शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले. तसेच वृक्षची भेटही देण्यात आली आहे.