Breaking News

तीन रुपयांनी महागणार पेट्रोल

नवी दिल्ली, दि. 11 - कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रतिबॅरल 52.50 डॉलर इतक्या वाढल्या असून तेलाच्या किमती मे महिन्यात दोन डॉलरने वाढल्या तेव्हा पेट्रोल 3.41 पैशांनी वाढले होते.
तेलाच्या किमती गेल्या आठ दिवसांतच 2 डॉलरने वाढल्या असून याचा परिणाम म्हणजे 15 जूनला तेल कंपन्यांची बैठक होणार असून त्यात पेट्रोलचा दर 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कच्चे तेल महाग झाल्यावर सरकारकडे दोनच पर्याय आहेत. एक तर सरकार अबकारी शुल्क कमी करू शकते अथवा पेट्रोल -डिझेलचे दर वाढवू शकते. सध्या पेट्रोलवर अबकारी शुल्क प्रति लिटर 21 रु. 48 पैसे आहे.