Breaking News

‘वन्यजीव सोयर्‍यां’ची ज्ञानगंगा अभयारण्यात स्वच्छता मोहिम

बुलडाणा, दि. 10 - ज्ञानगंगा अभयारण्यातील मुख्य रस्त्यावर पडलेले प्लॅस्टीक ‘वन्यजिव सोयरे’ग्रुपच्या वतीने जमा करण्यात आले. तसेच वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 
5जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून बुलडाणा येथील वन्यजीव सोय-यांनी ज्ञानगंगा अभयारण्यातील मार्गाचे दुतर्फा रस्त्याने जाणा-या येणा-या प्रवाश्यांनी तसेच सहलीसाठी आलेल्या लोकांनी दारुच्या, बियरच्या बाटल्या व प्लास्टिक पिशव्या अनेक ठिकाणी फेकलेल्या होत्या. त्या सर्व जमा करण्याचे काम सकाळी 8 वाजेपासून वरवंड फाट्यावरुन सुरु करुन तब्बल आठ तास चालत दुपारी 4 वाजता मोहिम पूर्ण केली.
लेखम नितीन श्रीवास्तव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 23 वन्यजीव सोय-यांनी ज्ञानगंगा अभयारण्यातील बाटल्या, फुटलेल्या बाटल्या तसेच प्लास्टीकच्या बाटल्या जमा करण्यासाठी श्रमदान केले. या मोहिमेत बुलडाणा वन विभागामार्फत 10 ते 15 वनरक्षकांनी सुध्दा मदत केली. ही मोहिम पूर्ण केल्यानंतर सर्व वन्यजीव सोय-यांनी आयोजित केलेल्या वन भोजनाचा आस्वाद वनरक्षक कर्मचा-यांसह घेतला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही वन्यजीव सोय-यांनी केली होती.
या मोहिमेत प्रा. अमोल वानखेडे, सागर आवटे, नितीन व्यवहारे, अमित श्रीवास्तव, दिनेश जाधव, अनिरुध्द अमीन, प्रशांत बांगर, गणेश सुरडकर, रमेश पवार, सतीश पाटील, किशोर जाधव, प्रमोद कुलकर्णी, संतोष कंकाळ, गणेश झगरे, तुषार तायडे, गुणवंत ठाकरे, श्रीराम देशमुख, जयसिंग श्रीवास्तव, गणेश श्रीवास्तव, आसिफ सैय्यद, नितीन श्रीवास्तव, प्रशांत सोनूने, अभिजीत देशमूख यांनी योगदान दिले.