‘रिंकु’चे संपूर्ण आयुष्य एका संधीने बदलले
अवघ्या महाराष्ट्राला 29 एप्रिलपासून याडं लावले त्या आर्चीचा म्हणजेच रिंकू राजगुरूने नुकताच आपला 15 वा वाढदिवस साजरा केला. सोलापूरच्या अकलूज गावी 3 जून 2001 साली जन्मलेली रिंकू राजगुरू आज संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ठरली आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली रिंकु राजगुरू ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. सैराटद्वारे प्रेक्षकांसमोर आलेल्या रिंकू राजगुरूचे सर्वच स्तरावरून भरभरून कौतुक होत आहे. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने रिंकू राजगुरूने प्रेक्षकांना घरातून सिनेमागृहापर्यंत ओढून आणण्याची ताकद ठेवली. सैराट हा चित्रपट आज सर्व विक्रम मोडून एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झाला आहे आणि यामध्ये अवघ्या 15 वर्षाच्या आर्चीचा म्हणजे रिंकु राजगुरूचा मोलाचा वाटा आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळेला आपल्या आईसोबत रिंकु राजगुरू भेटायला गेली आणि त्या एका भेटीने रिंकू राजगुरूचे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियाचे अवघे आयुष्यच बदलून टाकले. डान्स करायला आवडणार्या रिंकूला आपण कधी एवढा उत्तम अभिनय करू असे कधीच वाटले नव्हते. पण एका पारखीने तिची निवड केली आणि तिच्यातील कलाकाराला जगासमोर आणले.
रिंकूने कॉलेजमध्ये शिकणार्या तरूणीपासून ते अगदी एका मुलाच्या आईच्या भूमिकेपर्यंत सर्वच भूमिका अगदी हुबेहुब केल्या. पण मी कोणताच अभिनय केला नाही. नागराज दादाने जे जे करून दाखवले तेवढच केले असे अगदी साधेपणाने बोलणारी रिंकू प्रत्येकालाच भावली. सैराटमधील आर्ची आणि रिंकूमध्ये काही साम्य आहे का? रिंकूने आर्ची कशी साकारली? यासारखे प्रश्न विचारले तर मला काही कळत नाही, असे अगदी साधे उत्तर देऊन रिंकू शांत बसते. पण आजही तिच्या नजरेतून ती बरच काही बोलून जाते.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचा प्रवाहच रिंकूने अगदी वेगळ्या दिशेला नेला. अगदी झिरो फिगर इमेज असलेल्या अॅक्ट्रेस प्रेक्षकांना अगदी साध्या सरळ आपल्यातल्या वाटू लागल्या. सुंदर, गोरी आणि बोल्ड अशी अभिनेत्रीची व्याख्या रिंकूने मोडून एक नवीन व्याख्या निर्माण केली आणि खर्या अर्थाने चित्रपटाची हिरो ठरली.