सेहवागच्या ट्वीटमुळे पाकिस्तान्यांचा तिळपापड
नवी दिल्ली, दि. 08 - आयसीसीने नुकतेच पुढील वर्षी होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना या स्पर्धेसाठीही एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षी 4 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यावरुन भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही अनोख्या शैलीत पाकला आव्हान केले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांना पळता भुई करणारा सेहवाग मैदानाबाहेरही सोशल मीडियामध्ये पाकिस्ताविरुद्ध छक्के-चौके मारताना दिसतो. चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सेहवागने ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक वर्ष उरले आहे. माझी पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एकच विनवणी आहे की त्यांनी आपले टीव्ही फोडू नयेत. विजय-पराजय खेळाचा एक भाग आहे, असे म्हटले आहे. सेहवागच्या या ट्विटवर पाकिस्तानी खेळाडू घायाळ झाले असून त्यांनी देखील त्याच्या ट्विटला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.