Breaking News

अधिकार्‍यांनी नागरिकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करू नयेः आ. बोंद्रे

बुलडाणा, दि. 12 - आमदार राहुल बोंंद्रे यांच्या हस्ते चिखली तालुक्यातील 25 लाभार्थी कुटुबीयांना, कुटूंब अर्थसहायय योजनेचे प्रत्येकी वीस हजार रूपयांचे धनादेश तहसील कार्यालय चिखली येथे वाटप करण्यात आले. धनादेश वाटप प्रसंगी बोलतांना आमदार राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहायय योजनेंच्या संदर्भातल्या बैठकी नियमित होत नसल्यामुळे नागरिकांचे प्रश्‍न प्रलंबित राहतात. म्हणून दर महिन्याला योजनांसदर्भात बैठक घेवून नागरिकांचे प्रश्‍न तातडीने सोडविले पाहिजेत. तसेच अधिकारी नांगरिकांना कुठल्यही बाबीत उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक कार्यालयात येण्यास धजावत नाहीत. यावर वरिष्ठ अधिका-यांनी आपल्या कर्मचा-यांवर वचक ठेवला पाहिजे व नागकिकांचे कामे संवेदनशील  राहून मार्गी लावण्यास सांगितले पाहिजे असे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष काँग्रेस डॉ. सत्येंद्र भुसारी, आर. बी. वानखेडे सर, तहसीलदार लोखंडे साहेब, नायब तहसीलदार पवार, वाघुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आमदार राहुल बोंद्रे म्हणाले की, शासनांच्या अनेक योजनांची माहिती न मिळाल्यामुळे नागरिक त्या योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. परंतू या योजनांचा लाभ त्यांना घेता आला तर त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला, घराला हातभार लागुन, त्यांच्या कुटूंबाला सुरळीत चालण्यासाठी काही  अंंशी मदत होवू श्शकते याची जाण अधिका-यांनी ठेवली पाहिजे.  नागरिकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष न करता सहाकार्याची भूमिका घेवून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजु नागरिकांना, निराधारांना मिळण्यासाठी जनजागृती करून त्यांना लाभ दिला पाहिजे. असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, शासनाच्या अनेक योजना आहेत गावस्तरावर आपण आपल्या गावातील तलाठी,ग्रामसेवक यांच्याकडे जावून विचारपूस केली पाहिजे, तसेच संबधितांनी जर आपल्याला योग्य माहिती देण्याचे टाळाटाळ केल्यास आपण मला कळवावे, असे सांगितले.
यावेळी बाजार समिती संचालक रूपराव साळवे, विजय पाटील शेजोळ, ता. उपाध्यक्ष युवक काँग्रेस नंदु हाडे, श्रीकृष्ण इंगळे, विठठल इंगळे, दिपक कस्तुरे, समाधान सावळे, प्रवीण खेडेकर यांच्यासह तालुक्यातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.