सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा शुभारंभ
सातारा दि. 11 (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षित मातृत्व हे मातृत्व आरोग्य सुधारण्याचे व माता मृत्यू कमी करण्याचे एक प्रभावी साधन असल्याचे आढळून आले आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे दर महिन्याच्या 9 तारखेला संपूर्ण देशामध्ये राबविण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते झाला.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर, ता. जावली येथे झाला. यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रासकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पारगावकर, केळघरचे सरपंच जांभळे, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. कवारे, मोहनराव कासुर्डे, राजेंद्र धनावडे, आरो
ग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती उपस्थित होते.
डॉ. माने म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरसीएच कार्यक्रमांतर्गंत मागील काही वर्षात राज्याने ग्रामीण भागातील माता व बालकांना देण्यात येणार्या आरोग्य सेवामध्ये बरीच सुधारणा केली आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या माता मृत्यूच्या प्रमाणात बरीच घट झाली आहे. माता मृत्यू कमी करण्यात राज्य देशात दुसर्या क्रमांकावर आहे. त्याअनुषंगाने अभियान काळात प्रत्येक गरोदर मातेला प्रसुतीपूर्व काळात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा दिल्या जातील, याची काळजी घ्यावयाची आहे. परंतू आरोग्य संस्थामार्फत गरोदर मातांना नियमितपणे देण्यात येणार्या आरोग्य सेवा ह्या अभियानदरम्यान नियमित चालू राहतील व नियमित सेवांवर अभियानामुळे कुठलाही परिणाम होणार नाही.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे मुख्य उद्दिष्ट हे गरोदरपणातील दुसर्या व तिसर्या टप्यातील सर्व मातांना उच्च दर्जाची प्रसुतीपूर्व सेवा, तपासण्या व समुपदेशन करणे हे आहे. याकरीता प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गंत लाभार्थिचा वैद्यकीय पूर्व इतिहास घेऊन तपासणी करावी व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीही जोखीम नसल्याची खात्री करणेत येणार आहे. प्रसुतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थींचा रक्तदाब, पोटावरुन तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासण्यात येतील. गरजेनुसार विशेष चाचणी करण्यात येणार आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत गरोदर मातांची तपासणी करणेत येणार आहे. अभियान दिवशी तपासणीस येणार्या प्रत्येक गरोदर मातेचे एमसीपी कार्ड (माताबाल संगोपन कार्ड) भरण्यात येणार आहे अभियानाच्या दिवशी आलेल्या आहार, आराम, गरोदरपणातील काळजी, बाळंतपणाची तयारी, धोक्याची लक्षणे, संस्थात्मक प्रसुती व प्रसुतीपश्चात कुटूंब नियोजन, स्तनपानाबाबत समुपदेशन करणेत येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येणार आहे.