विक्रीकर कायद्याबाबत 450 चार्टर्ड अकौंटटस्ला मार्गदर्शन
अहमदनगर। प्रतिनिधी । 10 - चार्टर्ड अकौंटंटस च्या अहमदनगर शाखेच्या वतीने आयोजित शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत आयकर, सेवाकर आणि विक्रीकर कायद्यांबाबत राज्यातील 450 चार्टर्ड अकौंटंटस् यांना मार्गदर्शन करण्यात आले.
चार्टर्ड अकौंटंटस नगर शाखा व पश्चिम विभागाच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे 4 व 5 जून रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन करण्यात आले. परिषदेस दिल्ली येथील सीए गिरीष अहुजा, अशोक बत्रा, अंजनीकुमार शर्मा, बँगलोरचे के. चैतन्य, मधुकर हिरेगंगे, मुंबईचे किरण गारकर यांच्यासह मुंबई पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, संगमनेर, धुळे, नांदेड, अमरावती, नागपूर, सोलापूर, जालना, कोपरगाव, श्रीरामपूर, मनमाड, परभणी, पंढरपूर शहरातील सीए यावेळी उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी नगर शाखेचे सीए सुशील जैन, प्रसाद भंडारी, ज्ञानेश कुलकर्णी, किरण भंडारी, आदींनी प्रयत्न केले.