Breaking News

150 फूट दरीत बस कोसळून 8 जणांचा मृत्यू, 20 जखमी

हिमाचल प्रदेश, दि. 12 - खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोलन येथून 50 किमी दूर असलेल्या डोलारघाट येथील ही बस आहे.
अधिक माहितीनुसार, चिरगाव ते मंडी ही खासगी बसमध्ये 40 प्रवाशी होते. डोलारघाटात ती सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. चालकाला वळणाचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतातील चार लोकांची ओळख पटली असल्याचे डीएसपी नरवीर राठोड यांनी सांगितले. तर जखमीपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी माहिती दिली.
या घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि वाहतूक मंत्री जी.एस. बाली यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
डीएसपी ने मृतमधील 4 जणांची ओळख पटल्याचे सांगीतले, त्यात बिलासपुरचा 30 वर्षीय विकास, मंडीचा 21 वर्षीय तृप्ता, झारखंडचे 40 वर्षीय बनारसी महतो आणि कुल्लू जिल्ह्यातील 35 वर्षीय चौहान सिंह आहेत. अन्य 4 जणांची ओळख अजून बाकी आहे.