वेंगसरकर यांना जीवनगौरव
मुंबई, दि. 31 - क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीचा मी पूर्ण आनंद घेतला. प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक दौरा मी देशासाठी खेळलो. आजपर्यंतच्या माझ्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवर मी आनंदी आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. त्याच वेळी विराट कोहलीला सर्वोत्तम टी-20 खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.
सोमवारी मुंबईत झालेल्या सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार 2015-16 सोहळ्यात वेंगसरकर
यांना जीवनगौरव पुरस्काराने गोरविण्यात आले. या वेळी वेंगसरकर यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेनन यांच्या उपस्थितीत वेंगसरकर, वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी सीएट ड्रीम टीमचीही निवड केली. या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची निवड झाली.
“क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी युवा खेळाडूंना दर्जेदार क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अकादमी स्थापन केली. मध्यमवर्गातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली चमक दाखवतात. मात्र, सर्वांनाच सोयीसुविधांअभावी हे शक्य होत नाही. त्यामुळेच अशा खेळाडूंना अधिक मार्गदर्शन देण्याचा मी निर्णय घेतला,’’ असेही वेंगसरकर यांनी सांगितले.
युवा खेळाडूंना संदेश देताना वेंगसरकर म्हणाले, “शेवटपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. मेहनत आणि चिकाटी असणे महत्त्वाचे आहे. रणजी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही श्रेयश अय्यरसारख्या युवा खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागली नाही. यामुळे साहजिकच तो दु:खी झाला. परंतु, त्याच्याशी बातचीत करून त्याला शेवटपर्यंत आपले प्रयत्न सोडायचे नाही, असा सल्ला दिला. त्यामुळे युवा खेळाडूंनी कधीही मेहनतीत तडजोड करून नये.’’
या वेळी इंग्लंडच्या जो रुटला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. तर, रोहित शर्मा व आर. आश्विन यांना अनुक्रमे सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.