Breaking News

10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात

मुंबई, दि. 29 -  येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मात्र मान्सूनचे आगमन 10 जून नंतरच होईल असे सांगण्यात येत आहे. वेधशाळेच्या कृषीविषयक अंदाजपत्रात याविषयी भाकित करण्यात आले आहे.स्कायमेट या हवामानविषयक खासगी कंपनीनेही मुंबईतल्या मान्सूनचा प्रवेश 12 ते 13 जूनपर्यंत होईल, असे सांगितले आहे. मान्सून उशिरा पोहचणार असला तरी त्यानंतर मात्र महाराष्ट्रात पाऊस चांगला बरसणार असल्याचे भाकित वेधशाळेनेन वर्तवले आहे. पुढील पंधरवडयात केरळ आणि कर्नाटकमध्ये सामान्य तर मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दरम्यानच्या काळात मुंबईसह कोकणात मान्सूनपर्व सरी येण्याची शक्यता आहे.