मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपा अधिकार्याने पिस्तूल रोखले
औरंगाबाद, दि. 2 - महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीसाठी वसुली प्रमुखाने चक्क थकबाकीदारावरच पिस्तूल रोखले. ही घटना काल सिडको एन 2 येथील मायानगरात दुपारी घडली. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्च एण्डमुळे मनपाची वसुली मोहीम शहरात जोरदार सुरू आहे. वसूलीसाठी वॉर्ड अधिकारी विठ्ठल ढाके यांचे पथक दुपारी 12.15 वाजता सिडको एन-2 मायानगर येथील हॉटेल प्लॅटिनियम इनवर गेले होते. हॉटेलमालक जयाजी पवार यांना ढाके यांनी फोन केला. त्यांनी सायंकाळपर्यंत पैशांची व्यवस्था करतो, असे स्पष्ट केले.
त्यानंतर जयाजी पवार यांचे बंधू हरीश पवार हे हॉटेलवर गेले असता, त्यांच्या सोबत अरेरावी करीत ढाके यांनी पिस्तूल रोखले. सोबत असलेल्या कर्मचारी आणि इतरांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळल्याचा आरोप हरीश पवार यांनी केला. पिस्तूल रोखल्याप्रकरणी पवार यांनी ढाकेंविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविला.
दरम्यान, आपले कर’वसुलीचे ’टारर्गेट’ पूर्ण करण्यासाठी मनपा अधिकार्याकडूनच पिस्तुल रोखल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पालिकेचे प्रशासकीय आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, त्यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना तातडीने पत्र देऊन पालिकेत शस्त्र परवाना असणार्या अधिकार्यांची माहिती मागविली आहे.