महाबळेश्वरमधील तापमानात वाढ, स्ट्रॉबेरी उत्पादकांना प्रचंड तोटा
सातारा, दि. 3 - महाबळेश्वरचे नाव घेतले की आठवते ती महाबळेश्वरची चटकदार व आंबट गोड स्ट्रॉबेरी. ?मात्र ही स्ट्रॉबेरी आता महाबळेश्वरच्या शेतकर्यांसाठी तोट्यात जाणारे पीक झाले आहे. हवामानातील बदल व प्रचंड उष्णतेमुळे उत्पादनात निम्याने घट झाली असून दर आता 40 रुपये किलोवर आल्यामुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान उत्पादकांना झाले आहे.
समुद्र सपाटीपासून 4500 फुट उंचीवरील महाबळेश्वर या निसर्ग रम्य व थंड हवेच्या ठिकाणची स्ट्रॉबेरीला वेगळीच चव आहे. महाबळेश्वरच्या 47 गावातून दररोज 25 ते 30 स्ट्रॉबेरी ही देशभरात व परदेशी जाते. मात्र गेल्या 15 ते 20 दिवासापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. तसेच दर घसरल्यामुळे दररोज कोट्यवधी रुपयाचा तोटा शेतकर्यांना होत आहे.