आ.जगताप यांच्या जलसमाधी आंदोलनाचा जिल्हाधिकार्यांनी घेतली दखल शिष्ट मंडळाच्या बैठकीत नेत्यांबरोबर चर्चा । फळबागांना पाणी मिळण्याची शक्यता
श्रीगोंदा । प्रतिनिधी । 02 आमदार राहुल जगताप यांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा आणि बाळासाहेब गिरमकर या शिष्ठमंडळाची तालुक्यातील जास्तीत जास्त उद्भव भरून देणे तसेच फळबागांना पाणी देणे याविषयावर यशस्वी चर्चा झाली.
यावेळी आमदार राहुल जगताप यांनी जिल्हाधिकारयांना बोलताना सांगितले कि कुकडीच्या कालवा सल्लागार समितीमध्ये 4.2 टी.एम.सी उपयुक्त पाणी साठ्य्तील 2.5 टी.एम.सी पाणी उन्हाळी आवर्तनासाठी मंजूर करण्यात आले. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबई येथे तालुक्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर जनावरांना चार छावण्या, विद्यार्थ्यांना फी माफी, शेतकर्यांची वीजबिले, यासाठी विधिमंडळात आवाज उठवला व इकडे कुकडी कालवा प्रशासकीय अधिकार्यांनी लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाला अजिबात विश्वासात न घेता तालुक्यातील 7 उदभव भरनेसाठीचा चुकीचा अहवाल दिला यामुळे श्रीगोंदे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होणार असून फळबागा आणि जनावरांच्या चार्यांचा बिकट प्रश्न निर्माण होणार आहे .तसेच मागील उन्हाळी अधिवेशन मध्ये 2.5 टी.एम.सी पाण्याचे रोटेशन झाले असता 86 उदभवांमध्ये पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे यावेळेसहि आम्ही सदर केलेल्या यादीप्रमाणे उदभव भरू देण्यात यावे तसेच फळबागांनाहि पाणी देण्यात यावे.
यावर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी 7 पेक्षा जास्त उदभवांमध्ये पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच वरीष्टांशी चर्चा करून येणार्या कुकडीच्या आवर्तनातून फळबागांना पाणी देनेविषयी तसेच पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी चर्चा केली जाईल असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले.