निराधार महिला व मुलांकरीता काम करणार श्रीमंत योगी फौंडेशनची स्थापना ः आबासाहेब गुंड
अहमदनगर । प्रतिनिधी । 02 जिल्ह्यातील निराधार महिला व गरीब मुलांकरीता काम करण्यासाठी श्रीमंत योगी फौंडेशनची शिवजयंतीच्या मुहूर्तावर स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती फौंडेशनचे संस्थापक चेअरमन आबासाहेब गुंड यांनी दिली. यावेळी व्हाईस चेअरमन विक्रम शेळके, सचिव काशिनाथ जाधव, संचालक अतुल शिंदे, प्रथमेश ढेरे, अभिषेक घोलप, महेश ढजाळ, शशांक कुलकर्णी, राहुल लांडे आदिंची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
फौंडेशनचे उद्दिष्ट सांगताना गुंड म्हणाले, समाजामध्ये अजूनही मोठया प्रमाणात गरीब-श्रीमंत दरी आहे. दिवसेंदिवस गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होवून ही दरी वाढतच आहे. त्यामुळे गरीब व निराधारांवर सातत्याने मोठया प्रमाणात अन्याय होत आहे. त्यामुळेच या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी श्रीमंत योगी फौंडेशनची स्थापना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली. सर्वसामान्य रयतेच्या न्याय व हक्कासाठी महाराज लढले. त्यांच्या स्वराज्यात कधीही कोणावरही अन्याय झाला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याच्या जयंतीचे औचित्य साधून फौंडेशनची स्थापना केली आहे. या फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक योजना राबविण्यात येणार आहेत. निराधार महिला योजना, श्रीमंत योगी चिल्ड्रन सेंटर, गरीब विद्यार्थी दत्तक योजना आदिंसह विविध सामाजिक उपक्रमांवर संपूर्ण जिल्ह्यात भर दिला जाणार आहे. जिथे अन्याय होत आहे, त्या ठिकाणी श्रीमंत योगीचे सदस्य पोहचून अन्याय दूर करण्याचे काम करणार आहेत. फौंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात काम करणार आहे. यासाठी लवकरच शहराच्या मध्यवर्ती भागात संपर्क कार्यालय व हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी नि:संकोचपणो फौंडेशनकडे मदत मागावी. फौंडेशनचे सदस्य अहोरात्र मदतीसाठी धावणार आहेत.