मेराज खानला नेमबाजीत रौप्यपदक
रिओ दि जानेरो, दि. 26 - नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा आघाडीचा नेमबाज मेराज अहमद खान याने यशस्वी सलामी देत पुरुषांच्या स्कीट प्रकारात रौप्यपदक पटकावले.
मेराजच्या विजयाच्या रुपाने भारताला विश्वकरंडक स्पर्धेत ‘स्कीट‘मधील पहिलेवहिले पदक प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित विश्वकरंडक स्पर्धा रिओ दि जानेरो येथे पार पडत आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात 40 वर्षीय मेराजने 14 गुणांची कमाई केली. दरम्यान, स्वीडनच्या मार्कस स्वेन्सन यालाही समान गुण असताना त्याने आणखी एक गुण मिळवत सुवर्ण पटकावले. इटलीच्या तमारो कसांद्रो याने ब्राँझपदक मिळविले.