Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिन साजरा

सातारा/प्रतिनिधी। 25 - शहीद दिनानिमत्त शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जगदिश निंबाळकर, तहसीलदार चंद्रशेखर सानप व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.