Breaking News

उपलब्ध पाण्याची बचत हीच जीवसृष्टीची संगत

सातारा/ 25 - भविष्यकालीन तरतुदीसाठी पैशाची बचत मनुष्यप्राणी नेहमीच करत असतो. त्याचप्रमाणे सध्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचा लहरीपणा यामधून मिळणारे पाणी काटकसरीने वापरुन जलस्त्रोतांचे बळकटीकरण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी बनली आहे. पाण्याची बचत हीच आता जीवसृष्टीची संगत ठरणार आहे.
22 मार्च या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने 16 मार्च ते 22 मार्च असा जलजागृती सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान ही चळवळ महाराष्ट्रभर उभी राहिली आहे. याचे दृष्यपरिणाम दिसू लागले आहेत. काही ठिकाणी टँकरचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू या सर्वांत लोकसहभाग आणि लोकजागृती सर्वात महत्वाची आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 176 प्रकल्प आहेत. यामधील 117 पूर्ण झालेले असून 59 प्रकल्प बांधकामाधिन आहेत. यामध्ये 193.27 टीएमसी पाणीसाठा निर्माण झालेला आहे. म्हणजेच 2.15 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 1716 गावांपैकी 767 गावे लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत. कृष्णा, उरमोडी, तारळी आणि धोम-बलकवडी हे मोठे प्रकल्प आहेत. कुडाळी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, नागेवाडी आणि आंधळी हे मध्यम प्रकल्प आहेत. जिहे-कटापूर, कौटी केंजळ, वसना, वांगना, धनगरवाडी, हणबरवाडी या उपसा सिंचन योजना तर चिटेघर, काळगाव, बिबी, हुंबरली, निवकणे, महिंद, कुसवडे, पांगारे, चिखली, जांभळी हे लघु प्रकल्प आहेत.
कृष्णा प्रकल्प (ता. वाई)
* कृष्णा नदी (धोम व कण्हेर धरणे) प्रकल्पीय पाणीसाठा 23.601 टीएमसी
* निर्माण पाणीसाठी 23.601 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 74 हजार हेक्टर
*निर्माण सिंचन क्षेत्र 73 हजार 228 हेक्टर
* उर्वरित सिंचन 772 हेक्टर
* धोम व कण्हेर ही धरणे व जिल्ह्यातील संपूर्ण 57 हजार 242 हेक्टर सिंचन क्षेत्र लाभ क्षेत्र विकास प्राधिकण पुणे यांच्याकडे हस्तांतर
उरमोडी प्रकल्प (परळी ता. सातारा)
* उरमोडी नदी प्रकल्पीय पाणीसाठा 9.96 टीएमसी 
* निर्माण पाणीसाठी 9.96 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 27 हजार 750 हेक्टर (पैकी कायम दुष्काळी खटाव व माण तालुक्यातील प्रत्येकी 9 हजार 750 हेक्टर)
* निर्माण सिंचन क्षेत्र 5 हजार 183 हेक्टर
* उर्वरित सिंचन क्षेत्र 22 हजार 567 हेक्टर
तारळी प्रकल्प (डांगिष्टेवाडी ता. पाटण)
* तारळी नदी प्रकल्पीय पाणीसाठा 5.85 टीएमसी
* निर्माण पाणीसाठा 5.85 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 14 हजार 276 हेक्टर  (पैकी कायम दुष्काळी खटाव व माण तालुक्यातील प्रत्येकी 4 हजार 438 हेक्टर)
* निर्माण सिंचन क्षेत्र 6 हजार 902 हेक्टर
* उर्वरित सिंचन क्षेत्र 7 हजार 374 हेक्टर
धोम बलकवडी (ता. वाई)
* कृष्णा नदी प्रकल्पीय पाणीसाठा 4.08 टीएमसी
* निर्माण पाणीसाठा 4.08 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 18 हजार 100 हेक्टर  (पैकी कायम दुष्काळी खंडाळा तालुका 4 हजार 300 व फलटण तालुका 12 हजार 750 हेक्टर)
* निर्माण सिंचन क्षेत्र 9 हजार 548 हेक्टर
* उर्वरित सिंचन क्षेत्र 8 हजार 525 हेक्टर
कुडाळी मध्यम प्रकल्प (महु धरण, ता. जावली)
* महु नदी प्रकल्पीय पाणीसाठा 1.12 टीएमसी
* निर्माण पाणीसाठी 0.83 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 5 हजार 327 हेक्टर   
* निर्माण सिंचन क्षेत्र काही नाही 
* उर्वरित सिंचन क्षेत्र 5 हजार 327 हेक्टर
कुडाळी मध्यम प्रकल्प (हातगेघर धरण, ता. जावली)
* महु नदी प्रकल्पीय पाणीसाठा 0.27 टीएमसी
* निर्माण पाणीसाठी 0.086 टीएमसी
 मोरणागुरेघर मध्यम प्रकल्प (आंबेघर ता. पाटण)
* मोरणा नदी प्रकल्पीय पाणीसाठा 1.396 टीएमसी
* निर्माण पाणीसाठा 1.396 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 3 हजार 806 हेक्टर (पाटण व कराड तालुक्यातील)
* निर्माण सिंचन क्षेत्र 380 हेक्टर 
* उर्वरित सिंचन क्षेत्र 3 हजार 426 हेक्टर
वांग मध्यम प्रकल्प (मराठवाडी ता. पाटण)
*  प्रकल्पीय पाणीसाठा 2.73 टीएमसी
* निर्माण पाणीसाठा 0.60 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 6  हजार 200 हेक्टर     
* निर्माण सिंचन क्षेत्र 897 हेक्टर 
* उर्वरित सिंचन क्षेत्र 5 हजार 303 हेक्टर
उत्तरमांड मध्ये प्रकल्प (माथनेवाडी, ता. पाटण)
* प्रकल्पीय पाणीसाठा 0.88 टीएमसी
* निर्माण पाणीसाठी 0.88 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 4 हजार 800 हेक्टर     
* निर्माण सिंचन क्षेत्र 4 हजार 800 हेक्टर 
* उर्वरित सिंचन क्षेत्र निरंक
नागेवाडी मध्यम प्रकल्प (नागेवाडी, ता. वाई)
* बावधन ओढा प्रकल्पीय पाणीसाठा 0.23 टीएमसी
* निर्माण पाणीसाठा 0.23 टीएमसी
* प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 1 हजार 560 हेक्टर (वाई तालुक्यातील)
* निर्माण सिंचन क्षेत्र 483 हेक्टर 
* उर्वरित सिंचन क्षेत्र 1 हजार 077 हेक्टर
निसर्गाची विपुलता लाभलेल्या सातारा जिल्ह्यात एकीकडे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस महाबळेश्‍वर येथे पडतो. तर माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा सारख्या तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई भासते. पीक पध्दतीत बदल करुन त्याचबरोबर ठिबकचा मोठ्या प्रमाणात वापर करुन शेती करणे ही काळाची गरज आहे. कारण जल है तो कल है असे म्हटले जाते. भविष्यातील जीवसृष्टीची संगत ठेवण्यासाठी आत्तापासून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब पैशाप्रमाणेच ठेवला पाहिजे.
प्रशांत सातपुते 
(जिल्हा माहिती अधिकारी,
 सातारा)