सुशांत सिंह आणि अंकितांचे ब्रेकअप ?
मुंबई, 25 - अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे ब्रेकअप झाल्यानंतर, आता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. इंग्लिश वेबसाईट डीएनएनुसार दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत.
अंकिता लोखंडेच्या ओव्हर पझेसिव्हनेसमुळे सुशांत सिंहने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही सुत्रांनुसार सुशांत आणि अंकिताने परस्पर सामंजस्याने ब्रेकअप करण्याचे ठरवले. इतकेच नाही तर सुशांतच्या कारकीर्दीचा आलेख ज्याप्रकारे वाढत आहे, त्या तुलनेत अंकिताच्या करिअरला वेग नाही. सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे एका पुरस्कार सोहळ्यात अखेरचे एकत्र दिसले होते. यानंतर इतर इव्हेंट्समध्ये सुशांत एकटाच दिसला होता. कार्यक्रमात सुशांत एकटा दिसण्याचे कारण हे अंकितासोबत ब्रेकअप असल्याचे म्हटले जात आहे.