डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघात होणार साजरी
नवी दिल्ली, 25 - घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघातही साजरी होणार आहे.
156 देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही जयंती साजरी केली जाणार आहे. कमानी ट्यूबज उद्योग समूहाच्या अध्यक्षा कल्पना सरोज यांच्या कल्पनेतून हा योग जुळून येणार आहे. अशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी व्हावी अशी सरोज यांची इच्छा होती. लंडनमधले डॉ. आंबेडकरांचे घर राज्य सरकारने खरेदी केल्यानंतर त्यांच्या कल्पनेला खरी उभारी मिळाली. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संपर्क साधला. मोदींनाही सरोज यांची कल्पना आवडली आणि त्यांनी त्यांना सर्व सहकार्य करण्याचा शब्द दिला. त्यानंतर सर्व चक्र भराभर फिरली आणि सरोज यांना संयुक्त राष्ट्रसंघाकडून या कार्यक्रमाची परवानगी मिळाली.