बॉयफ्रेण्डसोबत प्रीती झिंटाचा विवाह
मुंबई,01 - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा तिचा अमेरिकन मित्र जीन गुडएनफसोबत विवाहबंधनात अडकली आहे. 28 फेब्रुवारी रोजी लॉस अँजेलसमध्ये तिने लगीनगाठ बांधल्याची माहिती आहे.
जीन हा प्रीतीपेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान आहे. मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. एप्रिलमध्ये प्रीती लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र प्रीती हे वृत्त नाकारत होती. लग्नानंतर प्रीती आपल्या मित्र, परिवाराला मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहे. प्रीती आणि जीन गुडइनफ हे वर्षभरापासून डेटिंग करत आहेत. 31 वर्षीय जीन लॉस एंजिल्समध्ये राहतो. तो फायनान्शिअल अॅनालिस्ट म्हणून काम करतो. या लग्नातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रीती आपल्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव करणार आहे.