होळीदरम्यान मारहाणीत विविध ठिकाणी 30 ठार
उत्तर प्रदेश, 25 - उत्तर प्रदेशमध्ये होळी साजरी करताना विविध ठिकाणी झालेल्या भांडणात 30 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, होळीनिमित्त गोळीबार, दोन गटांतील भांडणे आदी प्रकारांमुळे 30 जण ठार झाले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटांत झालेल्या भांडणामध्ये 19 जण ठार झाले. माडियॉन आणि गोसाईगंज परिसरात झालेल्या भांडणामध्ये दोन जण ठार झाले. तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना झालेल्या अपघातांमध्ये पाच जण ठार तर 40 जण जखमी झाले. राज्यातील बहुतेक रुग्णालये अपघातांतील जखमींनी भरून गेले होते. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती. तसेच चोख बंदोबस्तही ठेवला होता.