कास तलावात साडेतेरा फूट पाणीसाठा शिल्लक
सातारा, 19 - सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्या कास तलावाच्या पाणीपातळीत घट होत असून सध्या तलावात चौदा फूट दहा इंच एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी साडेतेरा फूट पाणीसाठा होता. कास तलावात एकूण पंचवीस फुटापर्यंत पाणीसाठा होतो.
सध्या ही पाण्याची पातळी खालावत आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्याला या तलावातून दोन दिवसाला एक इंच पाणीपातळी खाली जात आहे. गतवर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दररोज एक इंच पाणीपातळी खाली जात होती. तलावातील झिरपून वाया जाणारे पाणी दररोज मोटारीच्या साह्याने पाटात सोडले जात आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा कमी प्रमाणात वापरला जात आहे.