माजी सैनिकांच्या पाल्यांना एसएमएसद्वारे सी.ई.टी. परिक्षेबाबत माहिती
नाशिक, 07 - माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक आरक्षण व प्रवेश पात्रता सी. ई. टी. परिक्षेबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येणार आहे. माजी सैनिक, युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांचे 12 वी नंतरचे शिक्षण घेत असलेल्या पाल्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याकरिता आपला मोबाईल नंबर हे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे नोंदवावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.