Breaking News

नाशिकमध्ये प्रोस्पोर्ट फिटनेस सेंटर सुरू - पत्रकार परिषदेत दिली माहिती

नाशिक/प्रतिनिधी। 07 - प्रोस्पोर्ट फिटनेस हे फिटनेसचे हब असा लौकिक असलेल्या केंद्राने वेगवेगळ्यासोयी-सुविधांनी युक्त अशा फिटनेस सेंटरचा उपयोग आता नाशिककरांसाठी होणार आहे. त्याचे शानदार अनावरण नाशिकला नुकतेच करण्यात आले.या ठिकाणी फिटनेस, जखमांची पुनर्प्राप्ती, बळकटपणा वाढविण्यासाठी 
हे फिटनेस सेंटर महत्वाची भिू्मका बजावणार आहे. नाशिकच्या या सर्व सोयीसुविधांनी सज्ज सेंटरमुळे जागतिक स्तरावरील एक मोठे क्रिडा व फिटनेस व्यासपीठ या क्षेत्राला मिळणार आहे.भारदस्त फिटनेस आणि प्रतिकार शक्ती अधिक बळकट करण्यासाठी निम्न स्तरावरून उच्च पातळीवर कार्य करण्याची सिद्धता या फिटनेस सेंटरमध्ये आहे.
आपारंपारिक पद्धतीपासून उच्च पातळीवरील फिटनेसच्या शैलीत बदल करून घेण्याचा प्रयत्न प्रोस्पोर्ट फोर्टेच्या माध्यमातून करण्यात येतो. त्याचा उपयोग केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर कार्पोरेट क्षेत्रासाठी होतो. त्या अनुषंगानेच त्याची रचना व नियोजन केले गेले आहे. योग्य प्रशिक्षण, चयापचय क्रिया, शारिरीक गरजा, क्षमता, त्यानुसार अनुकूल फिटनेस व्यायाम यातून त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. फिजिओथेरपिस्टदेखील यात महत्वाची भूमिका बजावतात.  त्यांचा देखील हा कार्यक्रम जागतिक मानकांनुसार तयार करण्यात आलेला आहे.या केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने सर्व प्रकारचे फिटनेस कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करणे, संभाव्य ग्राहकांना या सुविधा समजावून देणे, शक्त तितका उत्तम कार्यक्रम तयार करणे, चांगल्या अद्यावत उपकऱणांचा उपयोग, कुशल प्रशिक्षक, अनकूल वातावरण, अंतर्मनातून उत्तम काम करण्याची इच्छा वा धारणा असलेल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे ध्येय साध्य करण्याचे लक्ष्य असल्यामुळे त्याचा उपयोग याचा वापर करणा-यांना निश्‍चितपणे होणार आहे. प्रोस्पोर्ट ही परिकल्पना केवळ या महानगरापुरतीच लौकिकप्राप्त अशी मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण देशभर तसेच टू टिअर महानगरमध्ये लवकरच त्याचा विस्तार होईल.
फिजिओथेरपीच्या बाबतीत तज्ञांना याची महत्वाची जबाबदारी दिली गेली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रोस्पोर्टने आपला महत्वाकांक्षी आराखडा तयार केला असून तो पूर्णत्वाला नेण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर नेतृत्व करू शकेल, अशा दृष्टीकोनातून त्यांनी कार्यसिद्धी निर्माण केली आहे. हा ब्रॅण्ड म्हणझे फार मोठी गुंतवणूक तसेच भागीदारीची संधी त्यातून निर्माण होत आहे. एका यशस्वी व्यासपीठाचे दैदिप्यमान व लौकिकप्राप्त प्रतिक त्यातून निर्माण केले गेले आहे.
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व प्रोस्पोर्ट चे संस्थापक झहीर खान यांच्या मते, आपली ओळख ही आपल्या फिटनेसमधून समजावी, अशी आजच्या काळात अनेकांची धारणा असते. त्यामुळेच उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपण खेळ किँवा कामाचे नियोजन त्या अनुषंगाने करत असते. त्याच्या नियमितता ठेवतो. पण खेळ किँवा आपली कार्यशैली आपल्याला हवा असलेलेपरिणाम देण्यास तितकीशी उपयुक्त नसते. त्यामुळे त्याचे प्रशिक्षण घेणे तसेच त्या अनुषंगाने आपल्या शरीराला दिशा देणे, ही आवश्यक बाब आहे. त्यातूनच आपल्या कमतरता तसेच त्रूटी दूर करण्यास मदत होते. शरीराच्या लवचिकतेवर आजच्या काळात अनेकजण भर देतात. वयाच्या 35 व्या वर्षानंतर सर्वसाधारणपणे लवचिकतेसाठी आपले शरीर तितकेसे सक्षम रहात नाही. पण अनेक गोष्टींमध्ये शरीरातील शक्तीपेक्षा लवचिकता अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे तशाप्रकारे शऱीराला वळविण्यासाठी भारतात अनेक वैद्यकीय तज्ञदेखील या माध्यमातून आम्ही उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर फिजोथेरपीलाही महत्वाचे स्थान दिले आहे. ते अत्यावश्यक आहे. अ‍ॅथलेटच्या नजरेतून आपण आपल्या शरीराला वळविले तर नक्कीच अशक्यप्राय गोष्टी आपल्यासाठी शक्य होऊ शकतात. तुम्ही शस्त्रक्रिया करून आपल्या शरीराला पूर्वीसारखे बनविण्यावर भर दिला पाहिजे. प्रोस्पोर्टची हीच संकल्पना असून त्यासाठीच त्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे फिटनेससाठी आम्ही लोकांना गंभीरपणे विचार करायला लावत आहोत तसेच प्रोत्साहित करत आहोत.
प्रोस्प्रोर्ट फिटनेस सेंटर हे तळ मजला, डॉ. पिंपरीकर हॉस्पिटल बिल्डिंग, प्रकाश हॉटेलच्या मागे, गोविंद नगर, चौक क्र. 5, मुंबई आग्रा रोड, नाशिक येथे सुरू होत आहे.