युवा पिढीने उर्दु साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज ः सय्यद सैफ अली
अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - उर्दू साहित्य व उर्दु भाषेसाठी कार्य करणार्या जुन्या काळातील लोक राहिलेले आहे, तेच थोडे फार काम करत आहे. पण हा वारसा पुढे ही चालावा यासाठी युवा पिढीने उर्दु साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उर्दु साहित्याचे गाढे अभ्यासक व चाँद सुलताना हायस्कुलचे माजी प्राचार्य सय्यद सैफअली सर यांनी केले.
मखदुम सोसायटीच्या वतीने जुन्या काळातील अहमदनगर येथील उर्दु कवी व साहित्यकार हिम्मत अमीर अहमदनगरी यांच्या स्मृतीदिना निमित्त ‘एका शाम हिम्मत अहमदनगरी के नाम’ व्दारे “ महेफिले मुशायरया’’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सय्यद सैफअली सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन इतिहासकार डॉ.असलम मिर्जा, हाजी शौकत तांबोळी, इंजि.इकबाल सय्यद, मन्सुरभाई शेख, इंजि. अनिस शेख, सलाम सर, सलीमखान पठाण, युनूस तांबटकर, कादीर सर होते.
सैफ अली पुढे म्हणाले की, आज नगर येथे जुन्या काळातील उर्दू साहित्यकांना लोक विसरले आहे. अश्या वेळी मखदुम सोसायटीने एक जुन्या दिवंगत कवीच्या स्मरण ठेवणे ही एक नव्या युगाची सुरुवात आहे. हे कार्य सतत पुढे सुरु राहण्याची अत्यंत आवश्यकता असून, नवीन पिढीला जुन्या इतिहासाबरोबरच तंत्रज्ञानाच्या युगात उर्दू साहित्यिक फार मागे पडले आहेत; हा साहित्यीक मागासलेपणा युवा पिढीने पुढाकार घेऊन संपवला पाहिजे.
मुशायरार्यामध्ये हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजाळा देतांना मुन्नवर हुसेन यांनी ....
मझधार ने दामन थाम लिया... कश्ती से किनारा छूट गया...मरने कि दुवाएं करते है... जिने का सहारा छुट गया...
मरने पे तुम्हारे ऐ हिम्मत ! अपने तो तडपते ही होगें.. अहेबाब कहेंगे रो-रो कर.. एक साथी हमारा छुट गया...
अशा अनेक रचना सादर करुन त्यांच्या कवितेचे वाचन केले. तसेच डॉ.असलम मिर्जा यांनी हिम्मत यांच्या बरोबरच्या त्या काळातील मुशायराचे व आजच्या मुशायरातील फरक नमूद केले.
डॉ.कमर सुरुर यांनी जुन्या काळातील कविंचे संग्रह करण्याचे कार्य ते करत असल्याचे नमूद केले. यावेळी नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून आलेल्यासर्व कविंनी मुशार्यामध्ये रंगत भरली. वाह ऽ.. वाह.., बहोत खूब... क्या कहने... मुकुर्रर... इरशादच्या गजरात मुशायरा रात्री 3 वाजता संपला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुन्नवर हुसेन यांनी तर सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. आभार राजूभाई शेख यांनी मानले. कार्यक्रमास यशस्वीतेसाठी शेख बिलाल अहेमद, नईम सरदार, डॉ.शमा फारुकी, शफाकत सय्यद, लतिफ तांबोळी, नादीर खान, शेख ताहेर, आमीर छोटेखान, मंजुर पेंटर, नसीम उस्ताद यांनी परिश्रम घेतले.