छगन भुजबळ यांना मोठा धक्का; समीर भुजबळ यांना अटक
मुंबई, 02 - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचलनालयाने अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज छगन भुजबळ, पंकज तसंच समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले होते. अखेर आज मुंबईत त्यांना अटक करण्यात आली. समीर भुजबळ यांना उद्या कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, छगन भुजबळ मुंबईत नसून ते अमेरिकेत गेल्याची माहिती मिळत आहे.दुसरीकडे, आम्ही करुन दाखवले. समीर भुजबळांना ईडीने अटक केली, आता पंकज भुजबळांचा नंबर, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
ईडी सुडबुद्धीने वागतंय - छगन भुजबळ
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात समीर भुजबळांना झालेली अटक ही सूडबुद्धीनं केली असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात काल ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनयानं भुजबळ यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. त्यानंतर रात्री उशिरा
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक केली गेली. त्यानंतर भुजबळांची आहे.