हुंडाईची बिझनेस क्लास जेनेसिस कार लाँच
नवी दिल्ली : हुंडाईने बिझनेस क्लासला लक्षात ठेऊन एक जेनेसिस नामक कार लाँच केली आहे. याची लांबी 4,990 एमएम (196.5 इंच) आणि रुंदी 1,890 एमएम (74.4 इंच) आहे. इतर भारतीय कारच्या बाबतीत ती अधिक जास्त आहे. ही कार 1,480 एमएम म्हणजेच जवळपास 58 इंच उंच आहे.
कारच्या मागच्या बाजूला अधिक जागा देण्यात आली आहे. या कारमध्ये अनेक पर्सनल कामे करू शकता. ही कार 220 किमी प्रतितासाच्या वेगाने धाऊ शकते. त्यामुळे यामध्ये 8 गेअर दिले आहेत जे ऑटोमॅटीक मोडमध्ये काम करतात.