Breaking News

’इट का जवाब पत्थर से’ - पर्रिकर

नवी दिल्ली, 06 - सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून माहिती मिळण्याआधीच हे दहशतवादी पठाणकोट हवाई अड्ड्यात घुसले असण्याची शक्यता आहे. पर्रिकर पुढे म्हणाले की ’भारत आता आपली सहनशीलता गमावत चालला आहे’. आता भारत ’इट का जवाब पत्थर से’ अशी भूमिका घेऊ शकतो असे पर्रिकर म्हणाले. 
या हल्ल्यासाठी आम्हाला प्रवृत्त करणारे पाकिस्तानात आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले.पुढे मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की ’आता आपल्याला काहीतरी ठोस योजना आखणे महत्त्वाचे आहे. आपल्याला जे त्रास देतात त्यांच्याविरुद्ध क
ारवाई करणे गरजेचे आहे. आज आपण कोणत्याही देशाविरुद्ध कारवाईची भाषा करत नाही कारण, देशाविरुद्ध कारवाई म्हणजे युद्ध असते. पण, आपण दोषींना शिक्षा द्यायलाच हवी. आता ही कारवाई कधी कारायची त्याची वेळ मात्र भारत ठरवेल.