Breaking News

राज्यात आता दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे

मुंबई, 06 - राज्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. याबाबत परीवहन आयुक्तांनी पत्रक जारी केले. 
 परीवहन आयुक्तांनी  शनिवारी या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढले. उच्च न्यायालयाने 2003मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणारा अशा दोघांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आल्याचे म्हटले होते. दरम्यान, वाहन नोंदणी अधिकार्‍यानेही वाहनाच्या कागपत्रांसोबत ग्राहकाला दोन हेल्मेट देण्यात आली आहेत का नाही, याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे शासनास बंधनकारक आहे. यासाठी दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट आवश्यक आहेत. तसे निर्देशही परीवहन आयुक्तांनी उत्पादकाला दिले आहेत.