Breaking News

भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष वाहनचालकांना लुटताना अटकेत

पंढरपूर, 07 -  टेंभुर्णीच्या भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कोकाटे यांना हायवेवर वाहन चालकांची लूटमार करताना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने कोकाटे यांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.   विजय कोकाटेंसह साथीदार गणेश पाचंगेलाही यावेळी पोलिसांनी अटक केली. 
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गाड्या  गाड्या आडव्या लावून वाहनचालकांना लुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गस्त वाढवली होती. अशाच गस्तीच्या वेळी काही तरुण एका वाहनाला अडवून दमदाटी करत असल्याचं दिसलं. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.