Breaking News

आधी रस्ते चांगले करा, मग हेल्मेटसक्ती - राज ठाकरे

पुणे, 06 -  राज्य सरकारच्या हेल्मेटसक्तीविरोधात सरकारने आधी रस्ते चांगले करावेत आणि मग हेल्मेटसक्ती करावी, असे राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 
कोणत्याही चांगल्या सुविधा नसताना हा निर्णय म्हणजे हेल्मेट कंपनीला फायदा करून देण्याच्या दृष्टीने घेतलेला आहे असेही राज ठाकरे म्हणाले. औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्ती केल्यानंतर पुण्यातही त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. प्रशासनाने अजून थोडा वेळ द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे. तर पुण्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करण्यात येईल, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.