Breaking News

कुख्यात गुंड पिस्तुल व काडतुसांसह जेरबंद

 पुणे (प्रतिनिधी)। 19 -  खुनाच्या गुन्ह्यात चार वर्षापासून फरार असलेल्या सचिन दांगट टोळीतील कुविख्यात गुंडास दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटने पिस्तुल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे.
आनंद गणपत जोरी  उर्फ बारक्या उर्फ भाऊ (वय 23, रा. चाळ क्र. 50 , खोली क्र. 5, पर्वती दर्शन) असे अटक केलेल्या कुविख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 80,600 रुपये किंमतीची दोन पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तो 2012 पासून फरार होता. तसेच त्याच्याविरूद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनेनुसार अवैध शस्त्र बाळगणार्‍या 
गुन्हेगारांची माहिती काढण्यासाचे काम सुरु असताना पोलीस कर्मचारी बापू जांभळे व काशीनाथ उभे यांना सचिन दांगट टोळतील चार वर्षांपासून फरार आरोपी अलका टॉकीज समोरील विशाल वाईन्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. 
तसेच त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून काल सायंकाळी ताब्यात घेतले.  पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 80,600 रुपये किंमतीची दोन पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे जप्त केली.