भुजबळ यांच्यावरील कार्यवाहीप्रश्नी राष्ट्रवादीचे निदर्शने
अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री मा.आ.छगण भुजबळ व त्यांचे परिवार यांचेविषयी राज्य सरकार हेतुपुर्वक भावनेतुन विविध प्रकारचे खोटे आरोप व चौकशी करुन गुन्हे दाखल करीत आहेत. मंत्रीपदावर असतांना घेतेलेेले निर्णय हे एकट्याने घेतलेले नसतात सदर निर्णय कॅबिनेट उपसमितीने घेतलेले असतात.यामध्ये मुख्यमंत्री व मंत्री यांचा समावेश असतो त्यामुळे हि सर्व जबाबदारी सामुहिक स्वरुपाची असल्याने त्यांबद्दल एकट्या भुजबळांना व त्यांच्या कुटुंबियांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे आज जिल्हाधिकारी यांना भेटुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवेदन सादर करुन सरकारच्या तसेच मुख्यमंंत्र्याच्या विरोधात निषेध नोंदवुन निदर्शने केले.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, सिताराम गायकर पाटील,अंबादास गारुडकर, सोमनाथ धुत, काकासाहेब नरवडे, शरद नवले, नंदताई वारे, दिलीपराव शिंदे, विजय मोढवे, कपिल पवार, संजय कोळगे, मधुरी लांढे, अमृता कोळपकर, लाल पटेल, बाळासाहेब शिंदे, निर्मलाताई मालपाणी, दिपक साळुंके, संजय सुद्रिक पाटील, भाऊसाहेब क्षीरसाठ आदिसह कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, छगण भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना संपुर्ण देशाला हेव वाटणारे असे दिल्ली येथील बांधलेले महाराष्ट्र सदन, हायमाऊट गेस्ट हाऊस, या वास्तु मंत्री मंडळाच्या मान्यतेने बीओटी तत्त्वावर बांधुन पुर्ण केल्या यामध्ये महाराष्ट्र शासनाची 1 रुपयाची ही गुंतवणुक नाही कुठलाही भुखंड यामध्ये विकासकाला दिलेला नाही झोपडपट्टी पुर्नवसन योजनेमध्ये झोपडपट्टी वासीयांना घरे बांधुन देणे व व त्या बदल्यामध्ये विकासाला टीडीआर हक्क देणे यामाध्यमातून ही कामे झालेले आहेत त्यामध्ये अभिनव काम करणारर्या बांधाकाम मंत्री भुजबळ यांना व त्याच्या परिवाराला विनाकारण लक्ष करुन त्यांना अडकविण्याचे काम राज्यातील भाजप सरकार करत आहे. अशाप्रकारे नेत्यास अडचणीत आणण्याचे उद्योग बंद न केल्यास अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विरोधात जिल्हाभर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार असा इशाराही त्यांनी दिला निवेदनाव्दारे दिला आहे.