छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांचा पासपोर्ट ईडीकडून जप्त
मुंबई, 06 - अंमलबजावणी संचलनालयाने समीर भुजबळ यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळ यांचा पासपोर्ट जप्त केला आहे. देशाबाहेर जाऊ नये यासाठी ईडीने ही कारवाई केली आहे. यासोबतच अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी पंकज भुजबळ यांना समन्सही बजावला आहे. शिवाय छगन भुजबळांनाही लवरकच समन्स बजावण्यात येईल, असे कळते.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने यापूर्वीच समीर भुजबळ यांना अटक केली आहे. आता पंकज भुजबळ यांना चौकशीसाठी बोलावल्याने त्यांच्या अटकेची शक्यताही वाढली आहे. दरम्यान, भुजबळांच्या कुटुंबीयांची चौकशी होत असतान छगन भुजबळ मात्र अजूनही अमेरिकेत आहेत.