भारत एक खूप सहनशील आणि खास देश - कतरिना
मुंबई, 07 - भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणार्या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे. मात्र असहिष्णुततेवर बॉलिवूडमधील खान मित्रमंडळींच्या विधानांसोबत ती सहमत नाही. कतरिनाच्या मते भारत हा एक खूप सहनशील देश आहे.
आपल्या ’फितूर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना दिल्लीत आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना, असहिष्णुतेच्या वादाची मला कल्पना आहे. पण, मला वाटते की भारत एक खूप सहनशील आणि खास देश असल्याचे कतरिना म्हणाली. तसेच ’जेव्हा मी भारतात पहिल्यांदा आले तेव्हा मला वाटले की मी माझ्या घरी परतले आहे.