Breaking News

नॅशनल हेराल्ड प्रकरणाला सामोरे जा! - सुप्रीम कोर्ट

 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 13 - नॅशनल हेराल्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काँगे्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, व राहूल गांधी सह इतर पाच काँगे्रस नेत्यांना खटल्याला सामोरे जाण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत.सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे.एस.खेहार यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. 
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याला सोनिया आणि राहुल गांधी यांना सामोरे जावेच लागेल, असे स्पष्ट मत नोंदवून सुप्रीम कोर्टाने सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले समन्स रद्द न करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार देण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सोनिया आणि राहुल यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे. एस. खेहार यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत सोनिया आणि राहुल यांच्यासह इतर पाच काँग्रेस नेत्यांना खटल्याला सामोरे जाण्याचे आदेश दिले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 20 फेब्रुवारीला होणा़र्‍या सुनावणीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा देऊन सुप्रीम कोर्टाने सोनिया आणि राहुल यांना अंतरिम दिलासा देखील दिला. पण ज्यावेळी कोर्टाला गरज वाटेल तेव्हा समन्स धाडला जाऊ शकतो त्यास संबंधितांना सामोरे जावेच लागेल, असेही कोर्टाने सुनावले.