पत्नी, मुलींची हत्या करुन इसमाचीही आत्महत्या
कल्याण, 01 - म्हारळ गावामध्ये पोटच्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होत. मात्र, घरातून घाण वास येत असल्यामुळे शेजार्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे घटना उघड झाली.
म्हारळ गावातील मोहन टॉवर इमारतीत रणजित यशवंतराव (45 वर्ष) हे पत्नी स्वाती (38 वर्ष) आणि दोन मुली श्रद्धा (14 वर्ष), आर्या (7 वर्ष) यांच्यासह राहत होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कामाला असणारे रणजित 5 दिवसांपूर्वी शेजारी आणि नातेवाईक यांना शेगावला जात आहोत असे सांगितले होते. मात्र 4 ते 5 दिवस त्यांचा मोबाइलही बंद होता. त्याच दरम्यान, इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या घरातून कुजल्यासारखा वास येऊ लागला. अखेर पाच दिवसांनंतर शेजार्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ही घटना समोर आली.
दोन लहान मुलींसह रणजित आणि त्यांची पत्नी स्वाती या चोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पत्नी स्वाती, चौदा वर्षीय श्रद्धा
आणि सात वर्षीय आर्या यांचे मृतदेह वेगवेगळ्या रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तर रणजितचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला.