Breaking News

शेअर बाजार कोसळला ;सेन्सेक्स 23 हजारच्या खाली


नवी दिल्ली, दि. 11 - शेअर बाजारात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण नोंदवण्यात आली असून,मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 800 अंकांनी कोसळून 23 हजारांच्या खाली बंद झाला. या घसरणीचा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही फटका बसला.
निफ्टीनेही 239 अंकांनी घसरुन सात हजारच्या खाली 6976 अंकांवर बंद झाला. मे 2014 नंतर झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. बांधकाम, ऊर्जा, बँक, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसई सेन्सेक्समध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येण्याची शक्यता असल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात आज पडझड झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाचा तिमाहीचा नफा दोन-तृतीयांशपेक्षा कमी झाल्यामुळे स्टेट बँकेच्या शेअर्समध्येही घसरण झाली.