Breaking News

पहिल्या आयपीएस किरण बेदींचे पती बृज यांचे निधन

नवी दिल्ली, 01 - देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे पती बृज बेदी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. गुडगाव येथील मेदांता मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांना किडनी आणि श्‍वसनाचा त्रास होत असल्यामुळे 28 जानेवारी रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बृज बेदी अनेक सेवाभावी संस्थांसोबत काम करत होते, त्यासोबत ते उद्योजक होते. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांचे निधन झाले.