Breaking News

मरिन ड्राईव्हला पुन्हा पिवळे एलईडी बसवले

मुंबई, 01 - मुंबईतील राणीचा रत्नहार म्हणजेच मरिन ड्राईव्हला पुन्हा त्याची सोनेरी झळाळी प्राप्त झाली आहे. 4.3 किलोमीटर भागातील मरिन ड्राईव्हचे पांढरे एलईडी दिवे पालिकेने बदलून पुन्हा पिवळे केले आहेत.
दक्षिण मुंबईची ओळख असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या दर्शनी भागाचे दिवे बदलण्यात आले आहेत. पण मरिन लाईन्स स्टेशनपासून बाबूलनाथ मंदिरापर्यंतच्या दिव्यांचे काम अद्याप बाकी आहे. विजेची बचत करण्यासाठी एलईडी दिवे बसवल्यानं मरिन ड्राईव्हचं सौंदर्य हरपल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत मरिन ड्राईव्हवरचे दिवे बदलण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार काही दिवे बदलण्याचे काम बाकी आहे.