शिवसेनेचे आ. सुरेश धानोरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
चंद्रपूर, 01 - शिवसेनेचे आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्याविरोधात तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा मतदार संघातील आमदार आहेत.
वाळू तस्करांवर कारवाई केल्याच्या रागातून धानोरकर यांनी एकनाथ गाडेकर या तलाठ्याला घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अश्लील शिवीगाळही केली. गाडेकर यांनी हे संपूर्ण संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे. वरोरा तालुक्यातील चारगाव परिसरात असलेल्या वाळू वाहतुकीवर या तलाठ्याने गुरुवारी संध्याकाळी जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर हे वाळू तस्कर थेट आमदार बाळू धानोरकर यांच्या दरबारात पोहचले आणि त्यांनी तलाठी गाडेकर यांची तक्रार केली. आपल्या मर्जीतील वाळू तस्करावर क
ारवाई केल्याच्या रागातून आमदारांनी ही धमकी दिल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या प्रकरणात आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात वरोरा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संभाषणात केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही
शिवीगाळ करत असल्याचे रेकॉर्ड झाले आहे.