वीज चोरी बंद करण्यासाठी मीटर तपासणी दरमाह होणार - सचिन लांजेवार
गंगाखेड, 13 - संपुर्ण शहर भारनियमन मुक्त करण्यासाठी वीज मीटर मध्ये फेरबदल करुन वीज चोरी बंद करण्यासाठी मीटर तपासणी मोहीम दरमाह होणार असुन या मध्ये कोणाची ही गय केली जाणार नाही थकबाकी पुर्णपणे वसुल करण्यात येवुन शहर भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प करण्यात
आला आहे. शहर भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वीज ग्राहकांनी आपले वीज बील अथवा थकबाकी भरावी असे आव्हान अभियंता सचिन लांजेवार यांनी केले आहे.
शहरातील वीज चोरीचा प्रकार कायमचा बंद करण्यासाठी महावितरणने वीज मीटर तपासणीची धडक मोहीम सुरू केली पहिल्याच दिवशी तपासणी मोहीम मध्ये 21 वीज ग्राहकांनी चोरी चा प्रकार उघड झाला त्यांच्यावर कार्यवाही ची प्रक्रीया व दंड आकारण्यात येणार आहे. मीटर तपासणीमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येणार नसुन वीज चोरीचा प्रकार बंद करण्यात येणार आहे. शहरात 9 हजार वीज ग्राहक असुन 2 केाटी 50 लाख थकबाकीदार आहेत. यांचा कडील थकबाकी जास्तीत जास्त वसुल करण्यात येणार आहे. मीटर तपासणी मोहीम दरमाह यापुढे राबविण्यात येणार आहे. अधिक्षक अभियंता व उपकार्यकारी अभियंता एस.एस. पानतावने यांचा मार्गदर्शनाखाली तपासणी मोहिम सुरू राहणार असुन यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेणार आहे. मीटरमध्ये फेरबदल करुन वीज चोरी आढळुन आल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी असे प्रकार करु नये व थकबाकी तात्काळ भरुन महावितरण ला सहकार्य करावे असे अवाहन अभियंता सचीन लांजेवार यांनी केले आहे.