Breaking News

बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम; सुप्रीम कोर्टाचा निर्णय


नवी दिल्ली, 12 - बैलगाडी शर्यतीप्रमाणे तामिळनाडूतील जलकट्टू प्रथेवरही सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकास जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतींवरची बंदी उठवली होती. पण केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे.
गेले काही दिवस राज्यात शर्यतींचा धुराळा उडावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप नेत्यांसाठी मात्र हा निर्णय धक्कादायक मानला जातो आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी भा
जप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावडेकरांकडे केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. जालिकट्टूमध्ये बैलांना मद्य पाजून, त्यांना मारहाण करुन उसकावलं जातं असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे. फक्त स्पेनमधल्या बुल फाईटप्रमाणे इथे बैलाला जीवे मारलं जात नाही. बैलगाडी शर्यतींमध्येही अशा पद्धतीने बैलांना मारहाण
होत असल्याचा आरोप आहे. यूपीएच्या काळात पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी जालिकट्टू, बैलगाडी शर्यत अशा दोन्ही खेळांवर बंदीला मान्यता दिली होती. मात्र सध्या तामिळनाडूच्या निवडणुका जवळ आहेत. पारंपरिक अस्मितेचा मुद्दा करत जयललितांनी ही बंदी उठवण्यासाठी केंद्रावर दबाव टाकायला सुरुवात केली होती.