जम्मू-काश्मीर: थंडीने तोडला 71 वर्षांचा विक्रम
श्रीनगर, 25 - जम्मू-काश्मीर राज्याने थंडीचा 71 वर्षांचा विक्रम तोडला आहे, अशी माहिती हवामान खात्याने सोमवारी दिली.
अधिकार्यांनी दिलेल्या महितीनुसार, ‘जम्मू-काश्मीर थंडीने गोठून गेले आहे. रविवारी अर्धा डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे रविवार हा सर्वाधिक थंडीचा दिवस ठरला आहे. सन 1945 नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात तापमान खाली आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात धुक्यांबरोबरच थंडगार वारे वाहत आहे. पुढील काही दिवस वातावरण अशाच पद्धतीचे राहील,‘ अशी माहिती हवामान खात्याचे संचालक सोनम लोटस यांनी दिली.